मनसेतर्फे उद्या तिथीनुसार शिवजयंती राज ठाकरे करणार शिवपूजन

Foto
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तिथीनुसार उद्या गुरूवारी फाल्गुन कृष्ण तृतीयेस शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.  त्यानिमित्य पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते सकाळी 11.00 वाजता क्रांतीचौक येथे शिवपूजन करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे नेते अमित ठाकरेही उपस्थित राहणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
तिथीनुसार होणारी ही शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ढोल पथक, नगाडा पथक, लेझिम पथक तसेच शिवकालिन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी 5.00 वाजता मनसे नेते अमित ठाकरे यांच्याहस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात येणार असून तेथून त्यांना भव्य मिरवणुकीने क्रांती चौक येथे आणण्यात येईल. या कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख हर्षवर्धन जाधव, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, बिपीन नाईक, वैभव मिटकर, गजन गौडा, राहुल पाटील, आशिष सुरडकर, मविसे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, अमोल खडसे,राजू जावळेकर, महिला आघाडीच्या सौ. लिला राजपूत, अ‍ॅड. नुतन जैस्वाल, शिक्षक सेनेचे सुभाष मेहेर, बिजू मारग, वाहतुक सेनेचे मनिष जोगदंडे, अशोक पवार, संदीप कुलकर्णी, प्रविण मोहिते आदिंनी केले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker